
खूप भरभरुन जगले COEP तला प्रत्येक क्षण ! पण आता हे सगळं शेवटचं...'भेटणं' कितीही साहाजिक असले तरी या विलगण्यातल्या विरहाला मात्र अंत नाही. एक अनामिक दु:ख आतून पोखरतयं, हे या क्षणाला जरा जास्तच जाणवतयं.पण फ़क्त एखाद्या क्षणावर उधळून द्यावं, आणि मोकळं व्हावं एवढं COEP सोडण्याचं दु:खही
स्वस्त नाही.या अवस्थेतून चटकन बाहेर यावे असेही वाटतयं. पण BC वरच्या हक्काच्या शेवटच्या काही सूर्यास्तांसाठी कालचक्र थांबवसं वाटतयं.आठवणींचे पक्षी उगीचच उडताहेत .....ते एकमेकाना चिडवणं,त्या BCवरच्या गप्पा,COEPचा माज...कुठे-कुठे आणि काय-काय साठवू?
fundoo AC क्लासरूमपेक्षाही boiler roomमध्ये केलेली लेक्चर्स ,रात्र रात्र जागून केलेल्या स्क्रिप्ट्स,end semच्या दोन दिवस आधी केलेली सबमिशन्स,स्पर्धा जिंकण्याआधीच COEP म्हणून केलेला माज आणि जिंकल्यानंतर BCवर केलेला कल्ला,अगदी शेवटच्या क्षणाला करंडक हुकल्यानंतर झालेली रडारड आणि एकमेकांच्या डोळ्यातल्या मिठपाण्याची आपणच केलेली सांत्वनं.सारचं कसं शब्दातीत!
काँलेज म्हटलं की,T1,t2 याहीपलीकडं COEPनं उंच उडायला शिकवलं.At any cost we are the best हे prove करायला माज दिला.COEPसाठी कुठल्याही व्यासपीठावर बोलयला उभं राहिल्यावर,गेल्या १५० वर्षातल्या शब्दांचं आपण प्रतिनिधित्व करतोय हे परंपरेचं दडपण असल्यानं स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा दिली,भरभरून घ्यायला आणि झोकून द्यायला COEPनं शिकवलं.इथल्या वडाच्या पारंब्यांनी आणि BCवरच्या काळवंडलेल्या पाण्यानही असंख्य प्रतिभांना जन्म दिला.अवघ्या आयुष्यची शिदोरी चार वर्षात मिळाली,'स्वर आले जुळुनि'म्हणत आयुष्यभर साथ देतील अशी नाती इथंच फुलली.जीवही ओवाळून टाकावा असे ऋणानुबंध जुळले.
पण आता मिळेल का पुन्हा या COEPच्या भिंतीत अडकलेला आपला श्वास?सहज COEPच्या गेटमधून आत येताना इथल्या मातीला स्पर्श करायला झुकणारा हात आणि अशावेळी मनात न अडवत आलेले आणि परिस्थितीचं भान राखावं म्हणून अडवून ठेवलेले असंख्य अश्रूक्षण... मुरलेल्या जखमेपरि असंख्य वेदनेच्या पलिकडचं दु:ख COEPया एकाच नावावर आणि इथल्या वडाच्या पारंब्यातून डोकवणारया चांदव्यावर उधळून द्यावं वाटतयं.
'मनी आभाळ दाटले...
चंद्रओटीत सांडले,
या शेवटल्या चांदव्यात
फ़क्त हुंदके अडले...'
आतल्या आतच उठणरया वादळाला मला अश्रूंची समिधा मुळीच द्यायची नाही.
'गम-ए-फ़िराक अब यूँ,
आदत ही हो जाए।
कलियों के दामन में,
कळी म्हणून मला फ़क्त एक फ़ूल व्हायचं होतं पण आता COEPच्या ताटव्याची सवय झालीये.जाण्याआधी इथला प्रत्येक सुगंधी श्वासात भिनवून घ्यायचाय.प्रतिभा सकारायला लावलेल्या प्रत्येक शब्दाला कडकडून भेटायचयं.COEPसाकारणारया प्रत्येक कणाचे आभार मानायचेत.आणि अजून थोडं झिरपायचयं COEPत मला!
रेश्मा,
२८ फ़ेब्रुवारी,२००७