Sunday, April 15, 2007

कैफ़

येणे वारयाचेही व्हावे,
तुझ्या श्वासान्चाच भास।
देह चेतवून जावी,
तुझ्या स्पर्शाची चिन्गार॥

ऐसे मागणेच त्याने,
पुन्हा मागावे फ़िरुन।
त्रुप्त इछ्येच्या उशाशी,
जागो अत्रुप्त तहान॥

ऐसे भरभरुन यावे,
साऱ्या भावनान्चे प्याले।
रिते व्हावे क्षणासाठी,
झिन्गवित दुख ओले॥

ऐसी छेडावी त्यानेही,
तार माझ्या अन्तरात।
प्राण झन्कारुन यावा,
त्याच्या एकाच स्वरात॥

ऐसी वेदनेच्या गर्भी,
व्हावी वेदना प्रसूत।
कैफ़ दुधाळून जावा,
तिच्या स्तन्यस्त दुखात॥

1 comment:

samiksha said...

कुणीतरी हव असत......
कुणीतरी हव असत......
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........


कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......


कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...........


कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील क विचारणार

Kuni tari haaaaav asaaat .