प्रेमाचे अन्जन,वात दिपवण्यापूर्वी
पापणीच्या कडेला अलवार पूस.
उजळल्यावर अन्गार झाले
तरी आग पाखडायला ,
तुझ्या डोळ्यातली निस्तब्ध आसवे
असतील माझ्याजवळ...
Sunday, April 15, 2007
कैफ़
येणे वारयाचेही व्हावे,
तुझ्या श्वासान्चाच भास।
देह चेतवून जावी,
तुझ्या स्पर्शाची चिन्गार॥
ऐसे मागणेच त्याने,
पुन्हा मागावे फ़िरुन।
त्रुप्त इछ्येच्या उशाशी,
जागो अत्रुप्त तहान॥
ऐसे भरभरुन यावे,
साऱ्या भावनान्चे प्याले।
रिते व्हावे क्षणासाठी,
झिन्गवित दुख ओले॥
ऐसी छेडावी त्यानेही,
तार माझ्या अन्तरात।
प्राण झन्कारुन यावा,
त्याच्या एकाच स्वरात॥
ऐसी वेदनेच्या गर्भी,
व्हावी वेदना प्रसूत।
कैफ़ दुधाळून जावा,
तिच्या स्तन्यस्त दुखात॥
तुझ्या श्वासान्चाच भास।
देह चेतवून जावी,
तुझ्या स्पर्शाची चिन्गार॥
ऐसे मागणेच त्याने,
पुन्हा मागावे फ़िरुन।
त्रुप्त इछ्येच्या उशाशी,
जागो अत्रुप्त तहान॥
ऐसे भरभरुन यावे,
साऱ्या भावनान्चे प्याले।
रिते व्हावे क्षणासाठी,
झिन्गवित दुख ओले॥
ऐसी छेडावी त्यानेही,
तार माझ्या अन्तरात।
प्राण झन्कारुन यावा,
त्याच्या एकाच स्वरात॥
ऐसी वेदनेच्या गर्भी,
व्हावी वेदना प्रसूत।
कैफ़ दुधाळून जावा,
तिच्या स्तन्यस्त दुखात॥
Subscribe to:
Comments (Atom)
